कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! जळगाव जामोद तालुक्यातील घटना

 
Fashi
जळगाव जामोद( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कर्जबाजारीपणाला कंटाळून ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे ही घटना घडली. भरत आत्माराम काळपांडे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

Shelke

         जाहिरात👆

भरत काळपांडे यांच्यावर विदर्भ ग्रामीण कोकण बँकेचे कर्ज होते.सततच्या नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. घरातील इतर सदस्य लग्नासाठी बाहेरगावी गेले असल्याने घरी एकटेच असलेल्या भरत काळपांडे यांनी घरात स्लॅबच्या कडीला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. भरत काळपांडे यांच्या पश्यात पत्नी, एक लहान मुलगा व वृध्द आई - वडील असा परिवार आहे.