शिवसेनेच्या मलकापूर तालुका प्रमुखांना कारागृहात जायची वेळ! बायकोला खावटी दिली नाही म्हणून..!

 
court
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पत्नीला खावटी दिली नाही म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मलकापूर तालुका प्रमुखांना कारागृहात जायची वेळ आलीय. तालुका प्रमुख दिपक चांभारे यांना अकोला येथील तिसरे न्याय दंडाधिकारी  यांनी  कारागृहात पाठवण्याचा आदेश दिला.
 

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख दिपक रमेश चांभारे यांनी अकोला येथील त्यांच्या पत्नीला ५ लाख ८८ हजार रुपयांची अंतरिम खावटी दिली नाही. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी न्यायालयाने चांभारे यांची एका महिन्यासाठी कारागृहात रवानगी केली. पत्नीला २० हजार रुपये व दोन चिमुकल्या मुलींच्या पालनपोषणासाठी १५ हजार रुपये देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.