स्वतःच्या आईच्या तोंडावर फेकला उकळता चहा! भांडकुदळ मुलाविरुद्ध गुन्हा दाखल; मोताळाची घटना!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लवकर चहा पिऊन घे, मला शेतात जायचे आहे असे म्हटले म्हणून मुलाने आईच्या तोंडावरच चहाचे पातेले फेकून मारले अश्या तक्रारीनुसार बोराखेडी पोलीस ठाण्यात संघपाल इंगळे याच्याविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  मोताळा तालुक्यातील शिरवा येथील पुष्पा अशोक इंगळे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता त्यांचा मोठा मुलगा संघपाल याला चहा दिला व लवकर पे मला शेतात जायचे आहे असे म्हटले, मात्र याच शूल्लक कारणावरून संतप्त झालेल्या संघपालने स्वतःच्या आईच्या तोंडावरच गरम चहाचे पातेले फेकून मारले. इतकचं नाही तर जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यात त्या जखली झाल्या, त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचार सुरू होते. याप्रकरणी पुष्पा इंगळे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी संघपाल इंगळे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.