BREAKING निलेश डुकरे सुसाईड नोट प्रकरणात तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल! वाचा चिठ्ठीत कुणाची नावे लिहिली होती..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरातील केबल ऑपरेटर तथा शेतकरी निलेश दत्तात्रय डुकरे यांनी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल ,२३ जुलैला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान डुकरे यांनी आत्महत्या करण्याआधी लिहिलेल्या सुसाईड नोट वरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अनिल बाबुराव जाधव, विलास चिंचोले आणि मनोज चंदन अशी आरोपींची नावे आहेत. तिघांची ही नावे निलेश डुकरे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवली होती. "त्या"तिघांनी माझी फसवणूक केली माझ्या नावावर पैसा घेतला, मला कर्जबाजारी केले त्यामुळे मी आत्महत्या करत आहे असे निलेश डुकरे यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले होते. आता बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात उपरोक्त आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.