अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी, सतत पाठलाग करून जिवे मारण्याची धमकी; 'सर्किट मजनू' विरुद्ध विनयभंगासह पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

 

मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :- धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून आपल्या जवळ असलेले फोटो सर्वत्र व्हायरल करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध धामणगाव बढे पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहे.

 मागील १ जुलै २०२३ ते १ मार्च २०२४ दरम्यान हा दुर्देवी घटनाक्रम घडला. पिडीत मुलीने आज ८ मार्च २०२४ रोजी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून आरोपी योगेश घरत( वय 20 वर्ष राहणार शिरला नेमाने ता.खामगाव )याच्या विरुद्ध धामणगाव बढे पोलिसांनी विविध कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी मध्ये नमूद आहे. की फिर्यादी आणि आरेापी हे एकमेकांचे नातेवाईक असुन वरील कालावधीत फिर्यादीची आरोपी सोबत ओळख शिरला नेमाने येथे मावस बहिणीचे घरी झाली. तेव्हा पासुन फिर्यादी आणि आरोपी मोबाईलवर एकमेकांशी बोलत होते.      
  वरील कालावधीत तो एकदा तिला शाळेतुन मोटर सायकलवर बसवुन थड येथील मंदिर परिसरात घेऊन गेला. एकांत ठिकाणी नेवुन जबरदस्तीने गैर कृत्य करत त्याबाबत मोबाईलवर फोटो काढले. फिर्यादीस सतत फोनवर व शाळेत तीचे मागे मागे येवुन पाठलाग करुन तुझे लग्न होवुन देणार नाही. तुझे माझ्या मोबाईल मध्ये असलेले फोटो सर्वत्र व्हायरल करुन तुझी बदनामी करेल. लग्न केले नाही तर जिवाने मारुन टाकण्याची धमकी दिली. 
    फिर्यादी ने महिला सदस्या व महिला पो.अंमलदार यांचे समक्ष तक्रार दिली. धामणगाव बढे पोलीसानी आरोपी योगेश घरत वय २० वर्ष राहणार शिरला नेमाने यांच्या विरुद्ध कलम 354, 354(अ), 354(ड), 506, भांदवी सहकलम 8, 12 पॉस्को कायद्या नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक बबन रामपुरे करीत आहे.