हे अतीच झालं! पोलीस स्टेशनला तक्रार दिली म्हणून घरचं दिलं पेटवून..! खामगावच्या दाल फैल भागातील घटना

 
fbn

खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवीगाळ करणाऱ्या नातेवाईकाच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली म्हणून चिडलेल्या नातेवाईकाने चक्क घराला आग लावली. ही घटना खामगाव शहरातील दाल फैल भागात घडली.

दाल फैल भागातील सौ. संगिता रामरतन थारकर (४८) या महिलेला तिचा नातेवाईक प्रफुल्ल पुरूषोत्तम थारकर याने ८ जुलै रोजी अश्लील शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्या विवाहितेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रफुल्ल विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी कलम २९४, ४२७, ५०६ भादंविचा गुन्हा दाखल केला होता. 

ही बाब प्रफुल्ल ला माहीत झाल्यानंतर तो संतापला.त्यामुळे चिडून प्रफुल्ल धारकर याने ९ जुलै रोजी रात्री सौ. संगिता धारकर यांच्या घराच्या भिंतीला छिद्र पाडून आग लावली. या आगीत १५ हजार रूपयांचे साहित्य जळून खाक झाले.
या प्रकरणी रामरतन धारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल थारकर विरूध्द कलम ४३५, ४३६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.