Amazon Ad

दुसरबीडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री तीन घरे फोडली; मोटरसायकलही दामटली..

 
दुसरबीड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुसरबीड येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. गावातील वार्ड क्रमांक १ मध्ये तीन ठिकाणी एकाच वेळी घरफोडी झाल्या असून दुचाकीही चोरट्यांनी पळवली असून सखाराम बारकु धब्दुले यांचा ७८ हजार ५०० रुपये, अनीसअली मोतेबर अली यांचा ६६ हजार २५० रूपये तर विठ्ठल राठोड यांच्या घरातील झडती घेत सामान अस्ताव्यस्त करत तिन्ही घरफोडीतून दुचाकीसह एकूण १ लाख ५६ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी ३१ मे रोजी मध्यरात्री पळविला आहे.
किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दुसरबीड येथे ३१ मे च्या मध्यरात्री नंतर वार्ड क्रमांक एक मध्ये वास्तव्यास असलेले सखाराम बारकु धब्दुले घराला लॉक करून स्लॅबवर परिवारासह जाऊन झोपले. सकाळी ४ वाजता लघुशंकेला खाली आले असता घराचा मागील दरवाजा उघडा दिसला. तसेच घरातील सर्वच सामान अस्ताव्यस्त दिसले. तसेच ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम व ४ ग्रॅम वजन सोन्याच्या दोन पोत व नगदी रोख २७ हजार रूपये असा एकुण ७८ हजार ५०० रूपयांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला.
तसेच येथील राहुल बाजीराव खंदारे यांचे जावई अमोल राजु गायकवाड रा. पिंप्री बरडा, जिल्हा हिंगोली हे येथे एका लग्नसोहळ्यासाठी आले होते. लग्न सोहळा संपल्यावर रात्री उशीरा सासरेबुवा यांचे घरासमोर एम.एच.३७ एल २२३० क्रमांकाची दुचाकी उभी केली होती. परंतु, सकाळी दुचाकी दिसून आली आहे. त्यामुळे अंदाजे १२ हजार रूपये किंमतीची दुचाकी लंपास केल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच अनिसअली मोतेबर अली हे सध्या शाळेला सुट्टया असल्याने परीवारासह मुळगावी पातुर येथे घराला कुलूप लावुन गेले होते. १ जून रोजी दुपारी ३ वाजता त्यांचे शेजारी शेख रऊफ शेख गणी रा. दुसरबीड यांनी फोन करून तुमच्या घराचे लॉक तुटलेले असून कडी लावलेली असल्याचे सांगितले. यावरुन पातूर येथून लगेच दुसरबीड येथे सायंकाळी साडेसहा वाजता पोलीस पाटील गजानन मखमले यांचे समक्ष घर उघडले असता घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसले घरातील लोंखडी कपाट व लोखंडी तीन पेट्या उघडलेल्या होत्या. कपाटातील ठेवलेली ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, कानातील सोन्याची बाळी वजन अंदाजे ३ ग्राम, चांदीचे पैजंन वजन अंदाजे १० तोळे, चांदीचे हातातील वाळे वजन अंदाजे ५ तोळे व नगदी रोख रक्कम ३० हजार रुपये, असा एकूण सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम ६६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलीस स्टेशनला तक्रा देण्यात आली. यावरुन पंचनामा करून अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, गणेश डोईफोडे, जाकीर चौधरी हे करीत आहेत.