बंद पडलेल्या जगदंबा जीनवर चोरट्यांची वक्रदृष्टी!

खामगावातील घटना
 
 
चोर

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खामगावच्या जनुना तलाव रोडवरील बंद पडलेल्या जगदंबा जीनमधील लोखंडी साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २१ नोव्हेंबरच्या रात्री ९ ते ११ वाजेदरम्यान घडली.

राजेश विश्वनाथ देशमुख (४१, रा. खामगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते जीनची देखरेख करतात. जगदंबा जीनजवळील ओमशंकर ॲग्रो मील येथे चौकीदार म्हणून मधुकर लक्ष्मण अवचार रात्रपाळीला हजर असताना त्‍यांचा रात्री ११ ला फोन आला की जगदंबा जीनसमोरून राऊंड मारत असताना जीनच्या समोरील गेटला लावलेले कुलूप तुटलेले दिसले. देशमुख यांनी तातडीने जीनकडे धाव घेऊन मित्र संदीप चौधरी यांच्यासह आत जाऊन पाहिले असता गोडावूनमध्ये ठेवलेले ७ हजार रुपयांचे लोखंडी सामान चोरीस गेल्याचे दिसले. घटनेची माहिती जीनमालक रोहित गोयंका यांना देऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. तपास पो. ना. श्री. शेळके करत आहेत.