चोरट्यांनीही केली पेरणीची तयारी! खामगावच्याअंकुर कृषि केंद्राचे गोडावून फोडून ७ लाखाचे बियाणे लांबवले..!

 
fgh

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  खामगावच्या अंकुर कृषि केंद्राचे गोडाऊन फोडून ७ लाखाचे सोयाबीन बियाणे अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना १४ जूनच्या रात्री घडली. याबाबत १५ जून रोजी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

खामगाव येथील अमृतबाग तलाव रोडस्थित अंकुर अशोक अग्रवाल यांचे ओंकारेश्वर मंदिराजवळ किशन मोहता गणेश आईलमीलमध्ये बियाण्याचे गोडाऊन आहे. यागोडावूनमध्ये केडियम यासह विविध कंपनीचे सोयाबीन बियाणे ठेवले होते.. १४ जूनच्या रात्री अज्ञात चोरट्याने सदर गोडाऊन फोडून बियाण्याच्या बॅगांमधील १९४ बॅग सोयाबीन बियाणे लंपास केले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक सोयाबीनच्या बॅग ह्या केडियम ३५५ या वानाच्या लंपास केल्या आहेत. एकूण ७ लाख ६ हजार ५० रूपयांची बियाणे लंपास केल्याची तक्रार अंकुर अग्रवाल यांनी शिवाजीनगर पोस्टेला १५ जून रोजी दिली आहे. या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द कलम ३८०, ४६१ भादंविचा गुन्हा दाखल केला आहे.