ते सत्यनारायणाच्या पुजेला गेले अन् इकड घरात विपरीत घडल! चिखलीच्या चव्हाणवाडीतील घटना
Oct 12, 2023, 18:57 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरातील चव्हाण वाडीत भरदिवसा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. घरमालकाने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.
संतोष मधुकर तरळकर (३२) हे चिखली शहरातील जालना रोडवरील चव्हाणवाडीत राहतात. ते एमआयडीसीत एका कंपनीत सुपरवायझर आहेत. दुपारी ते कामावर गेले होते. सायंकाळी त्यांना पत्नीचा फोन आला, आणि तातडीने घरी बोलावले.
संतोष तरळकर दुपारी कंपनीत गेल्यानंतर त्यांची पत्नी आणि आई सत्यनारायणाच्या पूजेसाठी नातेवाईकाकडे गेल्या होत्या. सायंकाळी त्या परतल्या तेव्हा त्यांना घराचे गेट उघडे व कुलूप तुटलेले दिसले. अज्ञात भामट्याने भरदिवसा घर फोडून घरातून रोख १५०० रुपये, १५ ग्रॅम सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला . चिखली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.