घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू होती अन् वरच्या खोलीत नवरीच्या बहिणीने जे केलं ते धक्कादायक! खामगावची घटना...

 
Bride
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगावात लगीन घरी दुर्दैवी घटना घडली बहिणीच्या लग्नाकरिता माहेरी आलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. शंकर नगर भागात ही घटना घडली आहे.
Dhanik
                   जाहिरात 
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक महिला अकोल्याची आहे. नाजमिन परवीन सय्यद तरबेज(३०) असे तिचे नाव आहे. ती शंकरनगर भागात वडिलांकडे बहिण्याच्या लग्नासाठी आली होती.
  
लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र अशातच ४ डिसेंबरला नाजमिन परवीन हिने वरच्या मजल्यावरील खोलीत छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर लगीनघरी एकच शोककळा पसरली. विवाहितेने आत्महत्या का केली याबाबत नेमके कारण समोर आलेले नाही.