खामगाव लगतच्या घाटपुरी शिवारात चोरी; शेतातून हजारोंचे साहित्य केले लंपास!
Jul 11, 2024, 09:00 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खामगाव शहरालगत असलेल्या घाटपुरी शिवारातील एका शेतातून पाईप व इतर शेतीचे साहित्य लंपास केल्याची घटना घडली.
घाटपुरी शिवारात गणेश भेरडे यांची शेत असून अज्ञात चोरट्याने शेताच्या गेटचे कुलूप उघडले. यानंतर शेतातील सहा पीव्हीसी पाईप व दोन लोखंडी पाईप यासह इतर शेती साहित्य चोरी केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर भेरडे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शेतातील साहित्य लंपास असल्याच्या घटना घडत आहेत. कोणीतरी पाळत ठेवून शेती साहित्य लंपास करत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. इतर काही ठिकाणीही शेती साहित्य लंपास करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसून येते.