युवा शेतकऱ्याने घरात उचलले टोकाचे पाऊल!

जळगाव जामाेद शहरातील घटना
 
 
गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या; नांदुरा तालुक्यातील घटना
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, १८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास जळगाव जामोद शहरातील भ्रातृहरीनगरात उघडकीस आली. अनिल बबन कपले (रा. भ्रातृहरीनगर, जळगाव जामोद) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
अनिल कपले यांचा मुलगा ट्युशन क्लासला तर आई- वडील शेतात गेलेले होते. दुपारी १२ च्या सुमारास मुलगा क्लासवरून परतला असता त्याला वडिलांनी गळफास घेतलेला दिसला. त्‍याने आरडाओरड करताच नागरिक व नातेवाइक धावले. घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्‍यांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात पाठविलस. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनिल यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. जळगाव जामोद पोलीस तपास करीत आहेत.