जागेच्या वादावरून विवाहितेसोबत केला चुकीचा प्रकार

खामगावात दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल
 
महिलेचा छळ
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अतिक्रमणावरून झालेल्या वादानंतर ४६ वर्षीय व्यक्‍तीने ३७ वर्षीय विवाहितेसोबत विचित्र प्रकार केला. तिला गुप्तांग दाखवून जागा सोडली नाही तर हे असेच सुरू राहील, अशी धमकी दिली. या घटनेने हादरून गेलेल्या विवाहितेने खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी विचित्र प्रकार करणाऱ्यासह त्‍याच्‍या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खामगावच्या शंकरनगरातील विवाहितेने राहुल भैयालाल चौधरी (४६) व अजय भैयालाल चौधरी (३५, दोघे रा. शंकरनगर) यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तक्रारीत म्‍हटले आहे, की ती आई-वडील व भावासह घरी असताना अजयने अतिक्रमित जागेच्या वादावरून तिला शिविगाळ करून तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्या आईला लाथा बुक्‍क्यांनी मारहाण केली. हे कुटुंब पोलिसांत तक्रार देण्यासाठी गेले असता विवाहितेला एकटी पाहून राहुलने तिला गुप्तांग दाखवून तुम्ही जागा सोडली नाही तर हे असेच सुरू राहील, अशी धमकी दिली. यामुळे विवाहितेला लज्जा निर्माण झाली, असे तक्रारीत म्‍हटले आहे. तपास पोहेकाँ काशीराम जाधव करत आहेत.