महिलेचे मंगळसूत्र हिसकावले! योगेश उर्फ चिंटू परसे याच्यावर शहर ठाण्यात गुन्हा..

 
हिंद
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातील तानाजी नगर परिसरात सकाळी फिरत असलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिस्कावल्या प्रकरणी योगेश उर्फ चिंटू परसे (रा. इंदिरा नगर)  याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  याबाबत तानाजी नगर येथील रहिवासी सुरेखा संजय तायडे यांनी काल रात्री पोलिसांत तक्रार दिली की, गुरुवारी सुरेखा तायडे ह्या सकाळी ७ वाजेच्या सुमारास तानाजी नगरातील बगीचात फिरत होत्या. दरम्यान, योगेश परसे उर्फ चिंटू हा तिथे आला. त्याने सुरेखा तायडे यांच्या गळ्यातील अंदाजे ५ तोळ्याची सोन्याची पोत हिसकावली. त्यावेळी आरडाओरड करण्याचा प्रयत्न करत केला परंतु घाबरल्यामुळे तायडे यांचा आवाज निघाला नाही. अचानक झालेल्या घटनेमुळे सुरेखा तायडे खूप घाबरून गेल्या होत्या, यांनतर त्या घरी निघून गेल्या. असे तक्रारीत म्हटले आहे. रात्री शहर पोलीस ठाणे गाठून त्यांनी सगळी हकीगत सांगितली. त्यावरून योगेश उर्फ चिंटू परसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचे राजकीय पक्षाशी देखील संबंध असल्याचे समजते.