बायको माहेरी राहत होती, नवऱ्याने टोकाचा निर्णय घेतला? मालगणी येथील घटना

 
ex

चिखली तालुक्यातील मालगणी येथे आज,१९ ऑगस्टच्या सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळला. सदर व्यक्ती ४ दिवसांपासून बेपत्ता होते. पत्नी माहेरी राहत असल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलल्या जात आहे.

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  चिखली तालुक्यातील मालगणी येथे एका व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळला. आज, १९ ऑगस्टच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. माधवराव मनोहर झिने(३६, रा.मालगणी) असे मृतकाचे नाव आहे. 

  चिखली बुलडाणा रस्त्यावरील मालगणी ते हातणी रस्त्यावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत हा मृतदेह आढळला. प्राप्त माहितीनुसार माधवराव झिने यांची पत्नी त्यांच्यासोबत राहत नव्हती.पत्नी आणि मुले सोबत राहत नसल्याने ते तणावात होते.मजुरी काम करणारे झिने यांनी आत्महत्या केली की ते विहिरीत पडले याबाबत तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहे. चिखली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.