बायको म्हणे मुलीला शाळेत जाऊद्या, नवरा म्हणे तिला घरीच ठेव! दोघांत वाद झाला अन् नवऱ्याने बायकोच्या डोक्यात....! खामगावची घटना

 
fhj

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मुलीला शाळेत पाठवण्यावरून दोघा नवरा बायकोेत वाद झाला. बायको मुलीला शाळेत पाठवा म्हणत होती तर नवरा मुलीला घरीच ठेव म्हणत होता. वाद एवढा विकोपाला पोहचला की नवऱ्याने बायकोच्या डोक्यात विट घातली, यामुळे बायको गंभीर जखमी झाली आहे. खामगाव शहरातील सजनपुरी भागात ही घटना घडली..

खामगाव शहरालगत असलेल्या सजनपुरीमधील रहिवासी लता रामा भगतपरे (४०) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलगी शाळेत जात असताना लताचा पती रामा किसन भगतपुरे याने मुलीला शाळेत जाण्यास विरोध केला. घरीच राहण्यास सांगितले. यावेळी पत्नीने शाळेत जाऊ द्या, म्हटले असता पतीने शिवीगाळ केली. तसेच डोक्यात वीट घातली. याप्रकरणी पोलिसांनी रामा भगतपुरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास नाईक पोलीस शिपाई सरज राठोड करीत आहेत.