डोंगरखंडाळ्याच्या सरपंचांवर गावाचा विश्वास नाही! अविश्वास ठराव पारित!१३/१ ने ठराव पारित, १ सदस्य तटस्थ

 
Dongar khandala
डोंगरखंडाळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येथील सरपंच बबन तुलाराम गाडगे यांच्यावर आज २० ऑगस्ट दुपारी दोन वाजता १३ विरुध्द १ ने अविश्वास ठराव पारित करण्यात आला आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दुपारी दोन वाजता अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी तहसिलदार विठ्ठल कुमरे, ग्रामविकास अधिकारी डी आर सदावर्ते, सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थीत होते. सभेच्या सुरुवातीला सदस्यांना सरपंचाच्या विरुद्ध ठेवण्यात आलेल्या विषयाची माहिती देण्यात आली. सभेच्या सुरुवातीला उपसरपंच श्याम बळीराम सावळे यांनी सूचक म्हणून सभा घेण्याबाबत सूचित केले. अनुमोदक म्हणून सदस्य वसंता दासू चव्हाण यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर अविश्वास ठरावाच्या दिलेल्या नोटिसवर चर्चा करण्यात आली. यावेळी उपसरपंच शाम सावळे यांनी सरपंच विश्वासात घेत नसल्याचे सांगितले. त्यावर सरपंचाने त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले.
त्यानंतर हात वर करून मतदान घेण्यात आले. यावेळी अविश्वास ठरावाच्या बाजूने १३ सदस्यांनी तर एक सदस्य तटस्थ राहिला. तर स्वता सरपंचाने अविश्वास ठरावाच्या विरुद्ध आपले मत नांेदविले. अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच श्याम बळीराम सावळे, सदस्य वसंता दासू चव्हाण, सुनील श्रीराम चव्हाण, अनिता गजानन चव्हाण, नीलिमा लक्ष्मण सावळे, दिलीप तेजराव काकडे, महेश मोहन सावळे, स्वाती शिवाजी सावळे, मीना अरुण सावळे, साधना गजानन सावळे, शोभा संतोष इंगळे, प्रज्ञा गुलाबराव कांबळे, गणेश उत्तम पवार या १३ सदस्यांनी आपले मत नोंदविले. तर अविश्वास ठरावाच्या विरुद्ध सरपंच यांनी मत मांडले. तर भारती ज्ञानेश्वर कुसळकर या तटस्थ राहिल्या.