कारमध्ये गुटखा घेऊन जातांना दोघांना पकडले!;स्थानिक गुन्हे शाखेची जळगाव जामोद तालुक्यात कारवाई; संजय राऊतांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल..!

 
Police station jalgaon
जळगाव जामोद(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):कारमध्ये गुटखा घेऊन जातांना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडल्याची कारवाई जळगाव जामोद तालुक्यात करण्यात आली आहे.
झाले असे की, पेट्रोलिंग च्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांना माहिती मिळाली की, मारोती इको कार मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखू संदीप सुनील भावसार (३५ ) वर्ष , किरण गोपाल येनकर (३३) दोघे (रा - आसलगाव तालुका - जळगाव जामोद) हे दोघे विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात आहेत. यावेळी संजय राऊत यांच्यासह त्यांचे पोलीस कर्मचारी यांनी निमखेडी फाटा (ता - जळगाव जामोद) येथे गुटखा घेऊन जाणारी कार (क्रमांक एम एच ४८ ए टी ०४८२) ची झडती घेतली त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल केसर युक्त गुटखा व तंबाखू किंमत ५ लाख ५२ हजार ८४० रुपये, दोन मोबाईल किंमत २० हजार रुपये, मारोती इको कार किंमत ४ लाख रुपये असा एकूण ९ लाख ७२ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी तक्रार सहाय्यक फौजदार संजय राऊत स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांनी दिली आहे. पुढील तपास पोउनि नारायण सरकाटे हे करीत आहेत