लोणारच्या हनुमान मंदिराच्या विश्वस्तांना टोळक्याने अडवून मारले! डोक्यावर दगड मारला;आरोपी सैय्यद मुजाहीद म्हणे, बहोत दिनोंसे आखों में था, तेरे तुकडे तुकडे करके सरोवर में फेक देंगे...!

रात्रीची थरारक घटना, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार शहरातून अतिशय खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. लोणार येथील प्रसिद्ध हनुमान मदिरांचे ट्रस्टी अथर्व कानेटकर (२४) यांना ७ जणांनी मिळून मारहाण केली, डोक्यात दगड टाकला. काल रात्री ८ वाजेच्या सुमारास लोणार शहरातील जुन्या शासकीय गोदामाजवळील अंधारात ही घटना घडली. अर्थव कानेटकर यांचा मित्र दिपक भास्कर राऊत यांनी आरोपींच्या तावडीतून त्यांची कशीबशी सुटका केली. शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर अथर्व कानेटकर यांनी लोणार पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिली. यावेळी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता. सैय्यद मुजाहिद, शेख दानिश आणि शेख जुनेद अशी ज्ञात आरोपींची नावे असून इतर ४ जण अनोळखी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशेष म्हणजे आरोपी आणि तक्रारदार यांचा कोणताही जुना वाद नाही, अथर्व आतापर्यंत कधीही आरोपीसोबत बोललेले नाहीत मात्र असे असतांना देखील त्यांना अडवून जबर मारहाण करण्यात आली आहे.

 प्राप्त माहितीनुसार काल रात्री ८ वाजेच्या सुमारास अर्थव आणि त्यांचे मित्र दिपक राऊत दोघे आपापल्या मोटरसायलने वल्लभभाई हायस्कूल समोरून जात होते. त्यावेळी जुन्या शासकीय गोदामाजवळ अंधारात सैय्यद मुजाहिद, शेख दानिश, शेख जुनेद व इतर चौघांनी अथर्व यांची मोटरसायकल अडवली. गाडी का अडवली अशी विचारणा केल्यावर "तू बहोत दिनोंसे आखो मे था, आज तुझे दिखायेंगे" असे म्हणत सैय्यद मुजाहिद याने अर्थाव कानेटकर यांच्या डोक्यात दगड मारला.बाकीच्यांनी पकडुन ठेवत गालावर चापटा बुक्क्यांनी मारहाण केली." तेरे तुकडे तुकडे करके सरोवर में फेंक देंगे" अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी अथर्व यांचा मित्र दिपक यांनी अथर्व यांची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली व उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालय गाठले. उपचारानंतर अथर्व कानेटकर यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून तक्रारीवरून ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सपोनि युवराज रबडे करीत आहेत.