ट्रॅक्टर ने मोटारसायकलला उडवले! भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू! वडिलांसह दुसरी मुलगी जखमी! मेहकर तालुक्यातील घटना

 
tractor
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव ट्रॅक्टर ने मोटारसायकलला धडक दिली. या भीषण अपघातात मोटासायकल वरील माय लेकी ठार झाल्या तर वडील व दुसरी मुलगी जखमी झाली आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव आलेगाव रोडवर जनुना फाट्याजवळ आज,३० मे च्या सकाळी ८ वाजता हा भीषण अपघात झाला. परवीन बी उस्मान शाह (३३) व खुशी उस्मान शाह (३) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत तर उस्मान शह(३७) व त्यांची दुसरी मुलगी नगमा(७) हे गंभीर जखमी आहे. शाह कुटुंब मूळचे डोणगाव येथील रहिवाशी असून सध्या ते बाळापूरात राहत होते. आईला भेटण्यासाठी उस्मान शहा पत्नी व दोन मुलींसह डोणगावला येत होते.
 

 उस्मान शाह मोटारसायकल ने कुटुंबासह डोणगावकडे येत होते. 
  डोणगाव आलेगाव रोडवरील जनुना फाट्याजवळील वळणावर गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकल वरील चौघेही गंभीर जखमी झाले. त्याच रस्त्याने डोणगाव कडे जाणाऱ्या नवाज कुरेशी यांनी तातडीने सर्व जखमींना त्यांच्या गाडीत टाकून उपचारासाठी मेहकर येथे हलवले. मात्र उपचाराला नेत असताना गोहोगाव जवळ खुशी(३) चा मृत्यू झाला. खुशीची आई परवीन बी(३३) यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात येत होते, मात्र वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. मायलेंकीचा मृत्यू आणि बाप व लेक गंभीर झाल्याची घटना घडल्याने डोणगावात शोककळा पसरली आहे.