टिप्परवाले सुसाट! शेगावात भीषण अपघात! टिप्परच्या धडकेत दोघे जखमी !

 
Acccident
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील माटरगाव भास्तन फाट्याजवळ काल १८ जानेवारीच्या रात्री भीषण अपघात घडला. त्यामध्ये टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी झाले आहेत. सचिन हिराडकर, सुमित उमाळे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टिप्परने दुचाकीला मागून धडक दिल्यानंतर लगेचच घटनास्थळावरून पळ काढला. 
रात्री ८ वाजेच्या सुमारास सचिन हिराडकर आणि सुमित उमाळे माटरगावच्या दिशेने निघाले होते. त्यादरम्यानच अज्ञात टिप्परने मागून धडक दिली. अपघात इतका भीषण झाला की, दोघे क्षणातच जमिनीवर पडले, त्यामध्ये एकाच्या पायावर गंभीर दुखापत झाली. गुडघ्यावर जबर मार लागल्यामुळे त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.