रोहडा येथे सुरू होता "तो" खेळ! अंढेरा पोलिसांनी पाप करणाऱ्या ११ जणांना रंगेहाथ पकडले

 
andhera police station

अंचरवाडी (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जवळच असलेल्या रोहडा येथे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर अंढेरा पोलिसांनी धाड टाकून ११ आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अंढेरा पोलीस स्टेशनला काही दिवसापूर्वी ठाणेदार म्हणून  विकास पाटील यांनी सूत्रे हाती घेतली. 
त्यानंतर त्यांनी धडक कारवायांचा सपाटा लावला आहे. अवैध धंदे, अवैध रेती वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याने मोठ्या प्रमाणावर जुगार, वरली मटका सुरू झाल्याचा तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या होत्या. दरम्यान, रोहडा येथे राजरोसपणे जुगार खेळल्या जात असल्याच्या गुप्त माहितीवरून अंढेरा पोलिसांनी जुगार अड्डयावर धाड टाकली. 

 यावेळी मुद्देमालासह अकरा आरोपींना अटक करण्यात आली. त्यात आरोपी रामदास यादव सोलाट, प्रवीण भगवान शिरोळे, पंढरी रघुनाथ लव्हाळे, दिनकर माणिकराव बुरुकुल, शुभम गजानन खरात, योगेश गजानन बूरुकुल, सुनील उत्तम साबळे, अंबादास रामचंद्र सोरमारे, गजानन माणिकराव बुरुकुल, विजय नारायण घारे, संतोष सुभाष भुसारी यांचा समावेश आहे. याप्रकरणी ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोहेकाँ कैलास उगले, भरत पोफळे, गोरख राठोड, सोनकांबळे, गवई, गिरी आदींनी सहभाग घेतला.