भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले! वडील ठार,मुलगा गंभीर जखमी! मेहकर डोणगाव रस्त्यावर झाला अपघात..!

 
Aaaa
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  भरधाव ट्रॅक्टर ने धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. मेहकर डोणगाव रस्त्यावर काल,५ मार्चच्या संध्याकाळी साडेसहाला ही घटना घडली. परसराम देवबा पद्मने (७१, रा.लोणी गवळी) असे मृतकाचे नाव आहे.

 लोणी गवळी येथील परसराम पद्मने व त्यांचा मुलगा श्याम पद्मने हे दुचाकीने जात होते.  त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये परसराम पद्मने  हे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा श्याम गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.