"हा" नाद लय बेक्कार! माय बाप शिक्षणासाठी पैसे देत होते, त्यानं इकड उधळले; त्याला पाहिजे होती कॉल गर्ल, ४ लाख ९३ हजाराला चुना लागला!

बुलडाण्याच्या उच्चशिक्षित तरुणासोबत झाले मोठे कांड! सायबर पोलिसांनी राजस्थानातून ५ जणांना उचलून आणले...

 
Bfncn
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हो..बातमीच जे हेडिंग तुम्ही वाचलय ते अगदी १०० टक्के खरं हाय.. शरीरसुख मिळवण्यासाठी एका तरुणाला कॉल गर्ल पाहिजे होती, त्यासाठी हातात असलेल्या स्मार्टफोन वरून एक वेबसाईट तरुणाने ओपन केली..वेबसाईट वर असलेल्या संपर्क क्रमांकावर तरुणाने संपर्क केला.." आमच्या कडे चांगल्या कॉलिटी च्या कॉल गर्ल आहेत, पैशांच्या मोबदल्यात त्या आम्ही तुम्हाला पुरवू, त्या अंत्यंत चांगली सर्व्हिस देतील" असे समोरून सांगण्यात आले..खुश होऊन तरुणाने समोरून देण्यात आलेल्या UPI ID वर वेगवेगळे व्यवहार करून
 १ एक लाख २७ हजार रुपये एवढी रक्कम पाठवली. याच हौशेपोटी तरुणाने कॉल गर्ल पुरवण्याचा दावा करणाऱ्या अन्य एका वेबसाईटला देखील वेगवेगळे ट्रांजेक्शन करून ३ लाख ७० हजार रुपये पाठवले.. कॉल गर्ल मिळतील या आशेपोटी तरुणाने ४ लाख ९३ हजार २८० रुपये गमावले...मात्र एवढे होऊनही त्याला उपभोग घेण्यासाठी कॉल गर्ल मिळाली नाही..तरुणाने संबधित वेबसाईट शी संपर्क करून पैसे परत मागितले मात्र त्याला पैसेही परत मिळाले नाहीत..अखेत आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने बुलडाणा सायबर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला, तपासाला वेग देत पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुजरात मधील अहमदाबादच्या ५ जणांच्या टोळीला राजस्थानमधून जेरबंद करीत बुलडाण्यात आणले. एसपी सुनील कडासने यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली.
  प्राप्त माहितीनुसार पीडित तक्रारदार तरुण बुलडाणा शहरातील सिफाद कॉलनीत राहणारा असून त्याचे वय २५ वर्षे आहे. सध्या तो कुंजखेडा ता.कन्नड (जि छत्रपती संभाजीनगर) येथील एका महाविद्यालयात BUMS (बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन आणि सर्जरी) च्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. कॅनरा बँक बुलडाणा शाखा आणि पंजाब नॅशनल बँकेत त्याचे खाते आहे. या खात्यात तो घरच्यांनी शिक्षणासाठी दिलेले पैसे ठेवत असतो. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार १८ नोव्हेंबर २०२३ रोजी तो वैयक्तिक कामासाठी नागपूर शहरात आला होता. त्यावेळी कॉल गर्ल मिळवण्याच्या हेतूने त्याने संकेतस्थळावर शोध घेतला. त्यातील एका संकेतस्थळावर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून त्यांनी कॉलगर्ल्स ची विचारणा केली. त्यावेळी त्याला पैशाच्या मोबदल्यात चांगली सर्विस देवू असे सांगून UPI ID नंबर पाठवण्यात आला. त्यानंतर त्याने २० नोव्हेंबर पर्यंत एकूण १ लाख २७ हजार रुपयांचे वेगवेगळे ट्रांजेक्शन केले. त्यानंतर तरुण बुलडाण्यातील घरी आला. रात्री ८ वाजेच्या सुमारास परत त्याने कॉलगर्ल साठी सर्च केले. त्या वेबसाईटवर असलेल्या फोन नंबर वर त्याने वेगवेगळे व्यवहार करून ३ लाख १० हजार रुपये पाठविले. मात्र १४ डिसेंबर २०२४ पर्यंत त्याला कॉल गर्ल पुरवण्यात आली नाही. त्यामुळे त्याने त्या संबधित वेबसाईटला दिलेले पैसे मागितले. पण पैसे परत मिळवण्यासाठी पुन्हा त्याच्याकडून ६० हजार रुपये मागण्यात आल्याचे तरुणाने तक्रारीत म्हटले आहे. अखेर मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यानंतर त्याने बुलडाणा सायबर पोलीस ठाणे गाठून ४ लाख ९३ हजार २८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार दिली. 
   प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी विविध कलमान्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. तपास चक्रे फिरली, तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेऊन अहमदाबाद येथील कथित सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला. त्यामध्ये दिवाण जैनुल आबेदिन (२२), सुजल खान रशीद खान पठाण (२२), जीत संजय भाई रामानुज (२५), चिराग कुमार खोडाभाई पटेल (३०), मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण (२६), सर्व राहणार अहमदाबाद अशा पाच जणांना २ मार्चला राजस्थान राज्यातील मंडळा गावातून ताब्यात घेण्यात आले.या टोळीकडून १० मोबाईल,१३ सिम कार्ड, ८ एटीएम कार्ड, एक चारचाकी, तसेच नगद ७२ हजार २०० रुपये असा एकूण ७ लाख २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीला न्यायालयासमोर हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई!
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक सुनील कडासने ,अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, यांच्या मार्गदर्शनाखाली सायबरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार शकील खान, राजदीप वानखडे, विकी खरात, केशव घुबे, संदीप राऊत, ऋषिकेश खंडेराव, यांनी केला.