कार्यक्रम हुकला! संग्रामपुरात चोरट्यांनी भर रात्री सोन्या चांदीच्या दागिन्यांचे दुकान फोडले, पण "अशी" झाली फजिती...

 
Bdbdbd
संग्रामपुर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संग्रामपुरात भामट्या चोरट्यांचा प्लॅन चांगलाच फसला..त्यांचा कार्यक्रमच हुकला..सोन्या चांदीच्या दुकानावर डल्ला मारण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला मात्र दुकानदार हुशार असल्याने भामट्या चोरट्यांच्या हाती काहीच लागल नाही... 
 त्याच झालं असं की संग्रामपुरातील संतोष बंकटराव काटोले (५३) यांचे संग्रामपूरच्या बाजार गल्लीत दुर्गा ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे. ३० ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी दुकान बंद केले आणि ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता त्यांना फोन आला, " तुमचे दुकान उघडे आहे, रात्री बंद केले नव्हते का?" अशी विचारणा त्यांच्या मित्राने त्यांना केली.
संतोषराव तातडीने त्यांच्या बाजारगल्लीतील दुकानात पोहचले. यावेळी दुकानाच्या शटरचे दोन्ही कोंडे तोडलेले असल्याचे दिसले. दुकानातील दागिन्यांचे डब्बे अस्थाव्यस्थ पडलेले होते. संतोषराव काटोले दुकानात कोणतेही दागिने ठेवत नाहीत, दुकान बंद करतेवेळी ते दुकानातील दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवतात, त्यामुळे चोरट्यांच्या हाती काहीच लागल नाही, असं संतोशराव काटोले यांनी पोलिसांना सांगितल. चोरीचा प्रयत्न केला म्हणून तामगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..