जिल्हा परिषद शिक्षकाच्या दुसऱ्या पत्नीने घेतला गळफास! स्वतःच्या विद्यार्थिनीसोबत थाटला होता संसार! गंभीर उबरहंडे शिक्षकाचे नाव..!

 
yjgy
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाच्या दुसऱ्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बुलडाणा शहरातील साईनगरात आज,३ मार्चच्या संध्याकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली. मनीषा गंभीर उबरहंडे (२०) असे  मृत विवाहितेचे नाव असून तिचे माहेरचे नाव  मनीषा जनार्दन जाधव असे होते.

प्राप्त माहितीनुसार मृतक विवाहितेचे माहेर  चिखली तालुक्यातील अंचरवाडी आहे. शिक्षक गंभीर उबरहंडे अंचरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक  असताना त्याचे मनीषाशी सुत जुळले, त्यामुळे शिक्षकाने मुलीच्या शिक्षणाचा भारही उचलला होता. दरम्यान शिक्षकाचा कारनामा उघड झाल्याने शिक्षकाची बदली झाली होती.

मात्र तरीही उबरहंडे याचे मनीषाशी संबंध कायम होते. हा प्रकार गंभीर उबरहंडे याच्या पत्नीला माहीत झाल्याने दोघांचे पटत नव्हते, त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गंभीर उबरहंडे याने मनीषा सोबत संसार थाटला होता. मात्र काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांवरून मनीषा सोबत सुद्धा गंभीर उबरहंडे याचे खटके उडत होते. त्यातूनच मनीषा ने आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे. बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.