झोका खेळता खेळता दोरीचा फास लागला! १३ वर्षीय चिमुकलीने जीव गमावला; मोताळा तालुक्यातील घटना

 
fg
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  झोका खेळताना दोरीचा फास आवळल्याने चिमुकलीचा मृत्यू झाला. मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथे ८ जूनच्या दुपारी ही घटना घडली .
 

प्राप्त माहितीनुसार कोल्ही गवळी येथील गणेश भाऊराव शिंदे यांचा गावाशेजारी गुरांचा वाडा आहे. ८ जूनच्या संध्याकाळी त्यांची मोठी मुलगी वैष्णवी तिच्या दोन लहान्या बहिणींसोबत वाड्यात असलेल्या झोक्यावर खेळत होती. खेळता खेळता दोर तिच्या गळ्यात आवळल्या गेल्या, त्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या लहाण्या बहिणींनी वैष्णवी कशीतरी करत आहे असे तिच्या काकांना सांगितले. वैष्णवीच्या काकांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत वैष्णवी चा मृत्यू झाला होता. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.