कायद्याचा रक्षक बनला भक्षक! पोलिसाने केला महिलेचा विनयभंग; शेगावातील घटना

 
Bcbx
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कायद्याचा रक्षक असलेल्या पोलिसानेच भक्षक बनून महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली. शेगाव शहर पोलिस ठाण्यात आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
आरोपी पोलीस कर्मचारी हा नांदुरा येथील राहणारा असून सोनाळा पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मोहन समाधान करांगळे (३५) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पिडीत महिला शेगाव शहरातील राहणारी आहे. पिडीत महिलेच्या घरी जाऊन लज्जास्पद कृत्य केल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. याप्रकरणाचा तपास शेगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष गद्रे करीत आहेत.