अपघातांची 'समृद्धी'; पुन्हा भीषण अपघात ! एक ठार,

 
डोणगाव (अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग हा अपघाती मार्ग बनला आहे. दिवसाआड अपघात घडत असल्याचे भीषण चित्र आहे. दरम्यान आज शनिवारच्या उत्तररात्री डोणगाव नजीक भीषण अपघात घडला. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुसऱ्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये एक ठार तर एक जण जखमी असल्याची माहिती आहे.
 प्राप्त माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील पेट्रोलपंपा जवळ एम. एच. ३२ एजे. ४६१६ क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच २९. टी.०७७० क्रमांकाच्या) धडक दिली. यामध्ये कलीम सय्यद सलीम (२४ वर्ष) रा. दारव्हा यांचा मृत्यू झाला असून मिर्झा कुदरत बेग (३१ वर्ष) रा. दारव्हा हे जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदत कार्य केले. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक कुदरत बेग याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.