पोलिस सांगून लावला चुना! देऊळगाव राजा येथील सोनाई ऍग्रो सर्विसेसच्या मालकाची कशी झाली फसगत? वाचा...
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) "हे बघा कार्ड...मी पोलीस आहे", तुमच्या परिसरात किती चोऱ्या होऊ लागल्या काही माहिती आहे का? तेव्हा तुमच्या जवळील अंगठी, चैन रुमालात बांधून ठेवून ठेवा.. असं बोलणाऱ्या व्यक्तीवर तुमचा विश्वास बसेलच ना.. कारण त्याने चक्क आपण पोलीस असल्याचं सांगितलं होत, पण काही वेळानंतर रुमाल उघडून बघितला तर त्या कथित पोलिसाच पितळ उघडं पडल. कारण रुमालात काहीच नव्हत, अश्या प्रकारे आपली फसवणूक झाल्याच समजताच देऊळगाव राजा येथील एका कृषी केंद्राचे मालक देवेंद्र जिंतूरकर यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञाता विरोधात २३ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला.
घटना शुक्रवारी दुपारी घडली. देऊळगाव राजा येथील सोहन ऍग्रो सर्विसेस या कृषी केंद्राचे मालक देवेंद्र जिंतूरकर हे नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात होते. दुपारच्या वेळी दुकानात कामावर असणारे गजानन आमटे कामानिमित्त बँकेत गेले होते. त्यावेळी देवेंद्र जिंतूरकर यांना घरून फोन आला. दुकानावर कोणी नसल्यामुळे, ते कुलूप ठोकून घरी गेले. कारण त्यांची नात बाहेरगावी निघाली होती.. नातीला वाटे लावले, घरी चहा पाणी घेतला आणि परत जिंतूरकर हे आपल्या दुकानाकडे निघाले. दुपारचे ४:३० वाजले होते. रस्त्याने जात असताना धोंडीराम महाराजांच्या मठासमोर एका अज्ञात व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या कारणावरून त्यांना थांबवले.
रंग काळा सावळा, बांधा मजबूत , उंच वर्णनाचा असं त्याचं एकंदरीत रूप होत. तो म्हणाला, रमेश तिडके यांचे कापडाचे दुकानाची झडती घ्यायची आहे, दुकानांमध्ये नशीली अमली पदार्थ आहेत का? ते पहायचे तेव्हा जिंतूरकर यांनी त्याला विचारले तुमचे खिशे फुगलेले कसे? खिशात काय आहे? त्यावेळी त्याने पोलीस असल्याच सांगितल, आणि पोलिसाचं कार्ड पण दाखवलं. पुढे तो म्हणाला.. तुमच्या परिसरात खूप चोऱ्या होत आहेत? तुमच्या गळ्यातील चैन हातातील अंगठी रुमालात बांधून ठेवा, ते ऐकून देवेंद्र जिंतूरकर यांनी आपली आभूषणे(११ ग्रम सोन्याची अंगठी किंमत १५ हजार आणि १५ ग्रॅम सोन्याची चैन ) रुमालात बांधायला सुरुवात केली. तितक्यातच त्या अज्ञाताने रुमाल हिसकावत गाठी बांधून त्यांच्याकडे परत केला आणि दुकानात जाऊन ठेवून द्या असे म्हणत तो त्याच्या मोटरसायकलने तेथून निघुन गेला. मात्र इतक्यातच आपले मोठे नुकसान होणार असल्याची कल्पनाही जिंतूरकर यांना नव्हती. त्यांनतर थोडसमोर जात त्यांनी रुमाल उघडून बघितला. पण रुमालात काहीच नव्हतं, त्यावेळी त्यांना धक्काच बसला. आपली मोठी फसवणूक झाल्याचे त्यांना समजले.लगेचच त्यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाणे गाठून त्या अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार नोंदवली, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून शोध सुरू आहे.