"तिचा" फोटो स्टेटसला ठेवला अन् त्याखाली लिहिले "भाऊची जान" ! रुईखेडच्या भाऊने केले मोठे कांड, रेकॉर्डिंगच व्हायरल करतो म्हणे....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका गावात धक्कादायक घटना घडली. ११ जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला. एका बहाद्दराने गावातील २६ वर्षीय विवाहितेचे फोटो व्हॉट्सअँप स्टेटस ला लावून 'भाऊची जान' असे कॅप्शन लिहिले. एवढेच नाही तर थेट पिडीतेचे गर गाठून ' माझ्याशी बोल , नाहीतर फोटो व्हायरल करेन! आणि समाजात तुझी बदनामी करेल. तुला, तुझ्या मुलांना माझ्यापासून धोका आहे अशी धमकी देवून तो निघून गेला. 
 ही घटना ५ जुलैची आहे. पिडीत विवाहिता मागील तीन वर्षांपासून पती व मुलांसह कामानिमित्त बाहेरगावी राहते. दरम्यान, ५ जुलै रोजी त्यांच्या मूळ गावातील काही लोकांनी पिडीतेच्या ननंदेच्या व्हॉट्सअपला मोबाईलचे काही स्क्रीनशॉट पाठविले. त्यामध्ये रुईखेडच्या भगवान टेकाळेने पिडीत विवाहितेचे फोटो स्टेटसला ठेवल्याचे दिसले. यांनतर पिडीत विवाहितेच्या ननंदेने हे सर्व फोटो पिडीतेला व तिच्या नवऱ्याला पाठविले. ६ जुलै रोजी पिडीता गावी होती. यावेळी भगवान टेकाळे हा संध्याकाळी तिच्या घरासमोर आला. " तू माझ्याशी बोल, नाहीतर तुझे फोटो, रेकॉर्डिंग व्हायरल करेन! तुझ्या मुलांना व पतीला माझ्यापासून धोका आहे अशी धमकी देवून तो निघून गेला. असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे पिडीता हादरली होती. तिने बुलढाणा शहर पोलिस ठाणे गाठले. घडलेली सगळी आपबिती सांगितली. यावेळी एकच आकांत उसळला. ११ जुलैला भगवान टेकाळे याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.