चिखलीच्या जिजाऊनगरात झालेल्या राड्याची दुसरी बाजु! अरुण पाटील म्हणाले, तस झालंच नाही; दबाव तंत्राचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले...

 
Psc
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या जिजाऊनगरात राडा झाल्याचे वृत्त बुलडाणा लाइव्ह ने दोन दिवसांपूर्वी प्रकाशित केले होते. पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एफआयआर नुसार सदर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते..महादेव खिरोडकर यांच्या तक्रारीवरून अरुण पाटील यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता याप्रकरणात पेशाने शिक्षक असलेल्या अरुण पाटील यांनी त्यांची बाजु "बुलडाणा लाइव्ह" कडे मांडली आहे..महादेव खिरोडकर यांनी दिलेली तक्रारच चुकीची आणि बनावट असल्याचे त्यांनी म्हटले आहे..
  Pds
                       जाहिरात 👆
बुलडाणा लाइव्ह कडे केलेल्या खुलाशात अरुण पाटील यांनी म्हटले आहे की" मी व माझा पाटील परिवार अत्यंत शांत आणि संयमाने जिजाऊ नगर भागात राहतो. मी पेशाने शिक्षक असून समाजाला दिशा देण्याचे काम ज्ञानदानाच्या माध्यमातून कर्तव्यभावनेतून करीत आहे, मी कशाला उगाच कुणाशी वाद घालेन" असे म्हणत त्यांनी महादेव खिरोडकर यांची तक्रार खोटी असल्याचा दावा केला आहे.
   २४ डिसेंबरच्या रात्री झालेला हा प्रकार समूळ खोटा असून तक्रारदामुळेच आमच्या भागातील सामान्य नागरिकांना त्यांचा त्रास आहे असेही पाटील यांनी बुलडाणा लाइव्ह कडे दिलेल्या खुलाशात म्हटले आहे. तक्रारदार यांची वादाची पार्श्वभूमी आहे..मात्र दबाव तंत्राचा वापर करून माझ्यावर व माझ्या कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा अरुण पाटील यांनी केला आहे. "खरं काय झालं हे प्रत्यक्षदर्शींना माहीत आहे,असे खोटे गुन्हे दाखल होणार असतील तर सामान्य माणसानं जगावं कसं?" असा सवालही अरुण पाटील यांनी उपस्थित केलाय.