येळगावच्या अंगणवाडी सेविकेच्या मुलीसोबत विपरीत घडल! १२ वी उत्तीर्ण मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात पोहचल्या अन्...सांगितली आपबिती

 
dfghjkl
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोशल मीडियाचा वापर कोण कशासाठी करेल याचा नेम नाही. हल्ली जिल्ह्यातच नव्हे तर सगळीकडे सायबर गुन्हेगाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: मुलींच्या नावाचा वापर करून सायबर गुन्हे करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथे अंगणवाडी सेविका असणाऱ्या एका महिलेच्या मुलीसोबत तसंच विपरीत घडल. बुलडाणा शहरातील सुंदरखेड परिसरातील शिवशंकरनगरात ही महिला राहते, महिलेने सायबर पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार दिली आहे.
 

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना २ मुली व १ मुलगा आहे. मोठी मुलगी यंदा १२ वी उत्तीर्ण झाली असून तिच्याकडे "रेडमी 9" प्रो हा फोन आहे. त्यावर ती तिचे इंस्टाग्राम खाते चालवत असते. दरम्यान १ जूनच्या रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या नावाचे एक फेक अकाउंट्स असल्याचे तिच्या लक्षात आले. फेक अकाउंट्स वर महिलेच्या मुलीचा फोटो होता. त्या अकाउंट्स वरून विविध अश्लील मॅसेज देखील टाकण्यात आले होते.  ते पाहून मुलीला धक्का बसला. ही बाब मुलीने अंगणवाडी सेविका असलेल्या तिच्या आईला सांगितली. त्यानंतर त्या  बनावट अकाउंट्सचे स्क्रीनशॉट काढून महिलेने मुलीला घेऊन  सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी फेक अकाउंट्स बनवणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..!