घरात एकटी असल्याची संधी हेरली अन् 'तो' तिच्या घरात शिरला!; नको ते केलं!मलकापूर तालुक्यातील दाताळ्याची घटना....

 
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घरात एकटी असल्याची संधी साधून एका विकृत व्यक्तीने महिलेसोबत नको ते केलं.मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे ही धक्कादायक घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार ५५ वर्षीय महिलेने याप्रकरणाची तक्रार दिली आहे . महिला घरात एकटी असल्याच्या संधीचा फायदा घेवून अनिल डिगांबर तायडे (४० रा. दाताळा ता. मलकापूर) हा १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान तिच्या घरात शिरला. वाईट उद्देशाने महिलेच्या पाठीमागून येवून तिचे दोन्ही दंड दाबून महिलेचा विनयभंग केला आहे. तू कोणाला काही सांगितले तर तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकीन अशी धमकीही तायडे याने दिली आहे. काल, २० ऑगस्ट रोजी तशी तक्रार ५५ वर्षीय महिलेने मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन दासर करत आहेत.