एकुलत्या एक अक्षय वर ऐन संक्रांतीला काळाचा घाला! भरधाव वाहनाने उडवले, जागीच मृत्यू!खामगाव तालुक्यातील घटना!
 Jan 15, 2024, 15:05 IST
                                            
                                        
                                    खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):ऐन संक्रांतीला खामगाव तालुक्यातील अक्षय वर काळाने घाला घातल्याने आवार गावावर शोककळा पसरली आहे.
                                    
 अक्षय तुळशीराम सातपुते (२१) रा.आवार हा १४ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान शेतातून त्याच्या मोटारसायकलने घरी येत होता. याचवेळी खामगाव अटाळी रोडवर भरधाव महिंद्रा बोलेरो पिकअप ने अक्षय ला जोरदार धडक दिली यामध्ये अक्षयचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्षयला खामगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत्य घोषित केले आहे. अक्षय हा त्याच्या आईला एकुलता एक आहे. अक्षयचे वडीलही काही दिवसांपूर्वी वारले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 
                                    