Amazon Ad

BREAKING खामगावच्या प्रकाश सोनींच्या खुनाचे गूढ उकलले! शेगावच्या क्लब मध्ये जिंकले होते पैसे, तेच अंगलट आले! तिघांनी छाताडावर सपासप भोसकेले; खामगाव पोलिसांनी आरोपींना केली अटक..

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खामगावच्या प्रकाश सोनी यांच्या खुनाचे गूढ उकलले आहे. याप्रकणातील आरोपी पोलिसांनी काही तासातच शेगाव येथून गजाआड केले असल्याची माहिती समोर येत आहे.
खामगाव शहरात २६ मे रोजी संध्याकाळच्या वादळी वाऱ्याने विद्युत पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता.यांचं संधीचा फायदा घेत त्या चौघांनी प्रकाश सोनी यांचा खून केला आहे. झाले असे की, प्रकाश गोपीनाथ सोनी ५० (रा.रेखा प्लॉट, खामगाव) हे काही दिवसांपूर्वी शेगाव येथील क्लब मध्ये खेळण्यासाठी गेले होते.सोनी यांनी मोठी रक्कमही त्यावेळी जिंकली होती. प्रकाश सोनी यांचे काही पैसे क्लबने बाकी ठेवले होते. पुन्हा चार-पाच दिवसांपूर्वी बाकी पैसे मागण्याकरिता प्रकाश सोनी शेगावला गेले होते. तेव्हाच प्रकाश सोनी यांचा क्लबच्या संबंधित काही लोकांसोबत मध्ये वाद झाला होता. शेगाव येथून काल २६ मे रोजी रात्री विजय सहदेव बढे,विठ्ठल एकनाथ बढे खामगाव शहरात आले होते.
वादळामुळे खामगाव शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विजय सहदेव बढे व विठ्ठल एकनाथ बढे हे रात्री दहा वाजताच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्ती सोबत प्रकाश सोनी यांच्या खामगाव बस स्थानका समोरील जय माँ पान टपरीवर पोहोचले तिथे त्यांनी प्रकाश सोनी यांच्यासोबत वाद घातला यानंतर प्रकाश सोनी यांच्या छातीवर विजय सहदेव बढे यांने दोन्ही हाताने मारून त्यांना मागे लोटले, विठ्ठल बढे याने सोनी यांना मागून पकडून ठेवले होते. दोन अनोळखी व्यक्तीने त्यांचे दोन्ही हात पकडून ठेवले होते.विजय बढे यांने त्याच्याजवळाची कुकरी काढून प्रकाश सोनी यांच्या छातीत भोसकून सोनी याना गंभीर जखमी केले होते. नंतर चौघांपैकी दोघे शेगाव रस्त्याने तर दोघे खामगाव बस स्थानकाच्या आवाराच्या दिशेने पडत सुटले होते. गोपाल सोने यांनी मित्राच्या मदतीने प्रकाश सोनी यांना खामगावच्या सामान्य रुग्णाला दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून त्यांना यांना मृत घोषित केले होते. याप्रकरणी गोपाल प्रकाश सोनी यांनी तशी तक्रार २७ मे रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत पोलिसांनी विजयी सहदेव बढे, ज्ञानेश्वर तेजराव हिंगणे, विशाल बाबुराव इंगळे यांना अटक केली आहे. पुढील तपास एपीआय संदीप गोंडाणे करीत आहेत.