भररस्त्यात मटन विक्रेत्‍याने काढली विवाहितेची छेड

खामगाव शहरातील घटना
 
 
rape
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भररस्त्यात ४२ वर्षीय विवाहितेची मटनविक्रेत्‍याने छेड काढल्याची घटना खामगाव शहरातील मस्तान चौकात पोलीस चौकीमागे आज, ८ नोव्‍हेंबरला सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. शिवाजीनगर पोलिसांनी मटन विक्रेत्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.
बाळापूर फैल खदान भागातील विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली. शेख रज्जाक शेख हबीब (५२, रा. मस्तान चौक, खामगाव) असे संशयिताचे नाव आहे. विवाहिता नगर परिषद शाळा क्रमांक २ जवळून मटन घेऊन घराकडे येत होती. त्यावेळी शेख रज्जाकने तिला आवाज दिला. तू मेरे पास का मटन क्यो नहीं लेके जाती... तू वैसे मटन लेके जा... असे म्‍हणून तिचा वाईट उद्देशाने हात पकडला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. तपास पोहेकाँ गोविंद चव्हाण करत आहेत.