मोटारसायकल घसरली! एक ठार,एक गंभीर जखमी; मलका पूर तालुक्यातील घटना...

 
buldana
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव मोटारसायकल स्लीप झाल्याने  झालेल्या अपघातात एक मोटासायकलस्वार  ठार तर एक गंभीर जखमी झाला. काल १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर चिखली रणथम जवळ हा अपघात झाला.

  sagvan

           (जाहिरात👆)

खामगाव येथील निलेश मोतीराम म्हात्रे(३२) व अजय ज्ञानदेव सोनवणे(३१)  हे दोघे एम.एच २८, बी.एस. १२९० क्रमांकाच्या दुचाकीने मलकापूर येथून मुक्ताईनगर कडे जात होते. त्यावेळी चिखली रणथम त्यांची दुचाकी स्लीप झाली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र उपचाराला नेत असताना वाटेतच अजय सोनवणे (३१) याची प्राणज्योत मावळली. निलेश म्हात्रे याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.