आई नळावर पाणी आणायला गेली अन् अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याला मोटारसायकलने उडवले! चिखलीच्या गजानन नगरात हळहळ! आरोपी युवक दवाखान्यातून पळून गेला पण...

 
child
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घराबाहेर खेळत असलेल्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याला भरधाव मोटारसायकलने उडवले. यात चिमुकल्याचा उपचाराला नेत असताना मृत्यू झाला. चिखलीच्या गजानन नगरात काल, १५ जूनच्या दुपारी हा अपघात झाला. निर्वाण कुलदीप जाधव असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे  नाव आहे. आरोपी १७ वर्षीय अल्पवयीन तरुण असून गरज नसतांना तो हौसेने मित्राची मोटारसायकल मिरवत होता.
 

प्राप्त माहितीनुसार निर्वाण घराबाहेर खेळत होता. त्याची आई जवळच नळावर पाणी आणायला गेली होती. त्यावेळी एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःच्या ताब्यातील मोटारसायकल सुसाट चालवून निर्वाण ला धडक दिली.  यावेळी स्थानिकांनी लगेच मोटारसायकल चालवणाऱ्या त्या युवकाला पकडले. निर्वाण ला तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेतांना वाटेतच निर्वाणचा मृत्यू झाला. इकडे स्थानिकांनी पकडुन ठेवलेल्या त्या अल्पवयीन आरोपीने दवाखान्यातून पोबारा केला. आज,१६ जूनच्या दुपारी मेहकर फाटा परिसरातून तो फरार होण्याच्या बेतात असताना त्याला पकडण्यात आले. चिखली पोलीस ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.