माहेरात येऊन विवाहितेने घेतला गळफास ! आई वडिलांच्या भेटीसाठी आली होती! मोताळा तालुक्यातील घटना

 
fashi

मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोताळा तालुक्याताल सारोळा पीर येथे माहेरी आलेल्या २३ वर्षीय विवाहितेने आई-वडिल शेतात गेले असतांना गळफास घेवून आत्महत्या केली. ८ एप्रिलच्या सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.  सौ. सविता सोनाने असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.


धामणगाव बढे पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या सारोळा पीर ता. मोताळा येथे माहेरी आलेल्या सौ. सविता संतोष सोनाने ( वय २३) या विवाहितेने शनिवार ८ एप्रिल रोजी आई-वडिल शेती मध्ये गेलेले असतांना सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला दोराच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली, अशी तक्रार सुनिल वखरे  पोलीस ठाण्यात यांनी 

पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा तपास  मोहनसिंग राजपूत हे करीत आहेत. सविताचे ३ वर्षापूर्वी येनगाव ता. बोदवड येथील संतोष सोनाने यांच्यासोबत लग्न झाले होते. ती आई-वडिलांच्या भेटीसाठी माहेरी आली होती. तीला एक छोटे बाळ असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.