बंद घराचे कुलूप तोडून मारला डल्ला! साहित्यांची केली नासधूस, बुलडाणा शहरातील घटना..

 
बुलडाण
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बंद घराचे कुलूप तोडून २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना काल ४जूनच्या दुपारी शहरातील मिलींद नगर भागात उघडकीस आली. चोरी आणि घरातील साहित्यांची नासधूस केल्याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आला आहे. 
   याबाबत मिलींद नगर येथील रहिवासी रुखमा चंद्रकांत पवार यांनी तक्रार दिली. त्यानुसार, शेगाव तालुक्यातील टाकळी येथे फिर्यादी रुखमा पवार हे संपूर्ण कुटुंबीयांसह ३ जूनला बहिणीच्या घरी गेले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी राहणाऱ्या एकाचा फोन आला. घराचे कुलूप तुटलेले दिसत आहे असे त्यावेळी सांगण्यात आले. त्यांनतर घरामधील कपाटात ठेवलेले २२ हजार रुपये अज्ञाताने चोरून नेल्याचे उघडकीस आले. घरातील इतर साहित्यांची देखील नासधूस केली. असे तक्रारीत म्हटले आहे. काल ४ जून रोजी दुपारी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्यात आली. यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.