मलकापूरात किन्नरावर झालेल्या अत्याचाराची घटना बनावट? मलकापुरातील किन्नर बुलडाण्यात जमले, म्हणाले तो लॉजवर करीत होता चुकीचे काम.....

 
Dghb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): व्यक्तिगत कामासाठी मलकापुरात गेलेल्या चिखलीच्या कथित किन्नरावर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना काल सर्वत्र वेगाने पसरली होती. मात्र या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. मलकापुरातील किन्नर त्यांची बाजू मांडण्यासाठी आज ३१ डिसेंबरच्या दुपारी बुलडाण्यात जमले. दरम्यान त्यांच्यावर झालेले आरोप पूर्णतः चुकीचे असल्याचे ते सांगत आहेत. चिखलीचा "तो" किन्नर कथित आहे. चुकीचे काम करताना त्याला आम्ही लॉजवर पकडले. त्याचे केस कापण्याच्या व्हिडियोत त्याचा सहकारीच आहे. शिक्षा म्हणून त्यावेळी त्याचे केस कापण्यात आले. असेही मलकापूर येथील किन्नरांनी सांगितले..
 सामान्य रुग्णालयात उपचारार्थ काल चिखलीचा कथित किन्नर दाखल झाली होती.दरम्यान गुरुवार २८ डिसेंबर रोजी त्याच्यावर मलकापुरात लैंगिक अत्याचार झाल्याचे तिने सांगितले होते. याप्रकरणी मलकापुरातील किन्नरांवर त्याने विविध आरोप केले होते .मात्र सगळे आरोप चुकीचे आहेत. इतकच नाही तर तो लॉजवर चुकीचं काम करताना आम्हा सगळ्या किन्नरांना दिसून आला असे किन्नरांनी आज बुलडाण्यात सांगितले. वृत्तलिहेपर्यंत बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती.
किन्नरांना केली पाच लाखाची मागणी! 
तक्रार मागे घेतो असे सांगून, मलकापुरातील किन्नरांना पाच लाख रुपयाची मागणी केली असल्याचे मलकपुरातील किन्नरांनी सांगितले.त्याची समजूत काढण्यासाठी आम्ही चिखलीकडे निघालो होतो. मात्र रस्त्यातच काही अज्ञात तरुणांनी आम्हाला रोखले. पाच लाख रुपये द्या आम्ही तक्रार मागे घेतो. असे त्यांनी म्हटले असा दावा बुलडाण्यात जमलेल्या मलकापुरातील किन्नरांनी केला.