नवऱ्याचा गावातल्या बाईशी इश्क होता; बिचारीने वैतागून गळफास घेतला! चिखली तालुक्यातील सावरखेड नजिकची धक्कादायक घटना! विवाहितेच्या पतीसह पोलिसांनी चौघांना उचलले...

 
Sapna
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नवऱ्याच्या अनैतिक संबधाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखली तालुक्यातील कव्हळा गावाजवळ असलेल्या सावरखेड(नजिक) येथे ही घटना घडली. सपना विशाल कासारे(२४) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सपनाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सपनाच्या पतीसह चौघाविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून आरोपींना अटक केली आहे. तिच्या नवऱ्याचे गावातल्या बाईशी अनैतिक संबंध होते, सपनाला मुलगा होत नव्हता म्हणून सासरचे तिचा छळ करायचे असे सपनाची आई बेबी अर्जुन रणखांब यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार २०१८ च्या जून महिन्यातील २० तारखेला सपनाचा विवाह विशाल कासारे याच्याशी झाला होता. सपनाला सुरुवातीचे काही दिवस सासरच्यांनी चांगले वागवले. मात्र काही दिवसांनी पती विशालचे गावातील "एका" बाईशी अनैतिक संबंध असल्याची बाब सपनाला कळली. सपनाने याबाबत पतीला जाब विचारला असता त्याने तिला जबर मारहाण केली असे तक्रारीत नमूद आहे.
  दरम्यानच्या काळात सपनाला दोन मुली झाल्या.सध्या मोठी मुलगी ४ तर लहान मुलगी २ वर्षांची आहे. मात्र असे असले तरी विशाल चे त्या बाईशी अनैतिक संबंध सुरूच होत. या कारणावरून दोघा पती पत्नीत सातत्याने वाद होत होता. सपना अनेकदा कंटाळून माहेरी जात होती मात्र आज ना उद्या त्यात सुधारणा होईल या आशेने पुन्हा सासरी येत होती मात्र तिची आशा फेल ठरली.
एके दिवशी विशालच्या फोनवर "त्या" बाईचा फोन आला. सपनाने तो फोन उचलला व यापुढे फोन न करण्याचे सांगितले. सपना तसाच फोन घेऊन त्या बाईच्या घरी गेली व दोघींमध्ये भांडण झाले. त्यावेळी विशाल तिथे पोहचला व त्याने पत्नी सपनालाच मारहाण केली. या घटनेची सपनाने अमडापुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती असे सपनाच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. मुलगा होत नाही कारणावरून देखील विशाल आणि सासू सासरे सपनाला मारहाण व शिवीगाळ करायचे. विशाल कोणताच कामधंदा करीत नाही म्हणून विशालला बोलण्याएवजी तिचे सासू सासरे दोषाचे खापर सपनावर फोडत होते. अखेर या त्रासाला वैतागुन सपनाने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. 
पोलिसांनी सपनाचा पती विशाल, विषाशले ज्या बाईसोबत अनैतिक संबंध आहेत ती बाई व सपनाच्या सासू सासऱ्याला अटक केली आहे.