तुझ्यामुळे माझ्या मुलीला दिवस गेले म्हणत मुलीच्या बापाने तरुणाला धमकी दिली, मारहाण केली! तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले; शेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

 
ps
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेगाव तालुक्यातील वरूड येथे एका २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय महादेव भोजने असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान मृतक अक्षयच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत गावातीलच एका कुटुंबाला आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. 
 

प्राप्त माहितीनुसार गावातीलच एका अविवाहित मुलीला दिवस गेले होते. त्या मुलीच्या बापाला अक्षय वर संशय होता. तुझ्यामुळे माझ्या मुलीला दिवस गेले ,तुला सोडणार नाही अशी धमकी मुलीच्या बापाने अक्षयला दिली होती. दरम्यान २१  ऑगस्टच्या रात्री अक्षय खामगाव वरून घरी जात होता. त्यावेळी त्या मुलीच्या बापाने व भावाने अक्षयला बेदम मारहाण केली.


   या प्रकारामुळे अक्षयला वैताग आला. अक्षयने घरी जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. अशी तक्रार अक्षयच्या आईने दिली आहे. तक्रारीवरून त्या मुलीच्या बाप व भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.