मुलगी रडत होती.. ते तिला घरात घेऊन गेले अन्‌ बाहेर काय झालं वाचा...

शेगाव शहरातील घटना
 
शेगाव शहर पोलीस ठाणे
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलगी रडत असल्याने तिला घरात घेऊन गेल्याची संधी साधून घरासमोर उभी मोपेड चोरट्याने लांबवली. ही घटना शेगाव शहरातील माऊलीनगरात काल, २७ डिसेंबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
सतीश विजय डांबरे (३१, रा. माऊलीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यांची टीव्हीएस ज्युपिटर कंपनीची मोपेड (क्र. MH 28BC3467, किंमत 25000 रुपये) चोरीला गेली आहे. सतीश यांच्या वडिलांनी मोपेड घरासमोर उभी केली. त्याचवेळी सतीश यांची मुलगी रडत असल्याने तिला घेऊन ते स्कुटी तशीच उभी ठेवून घरात गेले. थोड्या वेळाने बाहेर आले तर त्यांना मोपेड दिसली नाही. सतीश यांनी शेगाव शहर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पो. ना. राहुल पांडे करत आहेत.