"त्या" १७ मिनिटांत झाला खेळ! मोठ्या मुलीला शाळेत सोडून आला अन् घरी आल्यावर पत्नी अन् छोट्या लेकीचा खून केला! कटकटीतून खून झाल्याची शक्यता!

वर्षाला नवऱ्याचा त्रास होता; वर्षाची आई हंबरडा फोडून रडत होती, काल आले असते तर हे घडल नसत! वाचा मायलेकीच्या हत्याकांडांचा ग्राउंड रिपोर्ट..

 
jfjf

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केवळ चिखली शहरच नव्हे तर अख्खा जिल्हा हादरून सोडणारी घटना आज चिखली शहरात घडली. चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा साहेबराव दंदाले( माहेरचे नाव) हीचा व तिच्या दीड वर्षीय चिमुकलीचा नवरा किशोर कुटे याने चाकूने भोसकून खून केला. मोठी मुलगी शाळेत होती म्हणून वाचली. मायलेकीचा खून केल्यावर किशोरने अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कवठळ येथील विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आधी किशोरने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली, त्यानंतर मायलेकीची हत्या झाल्याचे उघडकीस आले. वर्षा दंदाले असे हत्या झालेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे तर दीड वर्षाच्या कृष्णाचा देखील यात बळी गेला. अवघ्या १७ मिनिटांत हे हत्यांकाड झाल्याचे सीसीटिव्ही फुटेज वरून स्पष्ट होत आहे.

 ९ वाजून ३१ मिनिटांनी किशोर त्याची मोठी मुलगी ओवीला शाळेत सोडून घरी आल्याचे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. त्यानंतर ९ वाजून ४८ मिनिटांनी किशोर घरातून बाहेर पडला अन त्याने थेट कवठळ गाठून तिथल्या विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. कवठळला जात असताना तो वर्षाची स्कृटी घेऊन गेला होता.वर्षाची स्कृटी रस्त्यावर उभी असल्याचे वर्षाच्या चुलत भावाला दिसले. तिथे पाहणी केल्यावर किशोरने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. ही बाब वर्षाच्या चुलत भावाने तिचा सख्खा भाऊ संतोष याला सांगितली. संतोषने बहीण वर्षाचा फोनवर अनेक फोन केले, मात्र फोन उचलल्या जात नव्हता. त्यामुळे संतोषने थेट वर्षाचे घर गाठले, त्यावेळी दरवाजा लोटलेला होता. दरवाजा उघडून घरात प्रवेश करताच संतोषला बहीण आणि भाची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, संतोषने आक्रोश केल्यानंतर आजूबाजूची मंडळी गोळा झाली, यावेळी घरातील टिव्हीचा आवाज जोरजोरात सुरू होता असेही प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

कटकटीतून झाला वर्षाचा खून?

किशोर व वर्षाचे मुळ गाव चिखली तालुक्यातील खैरव..तर वर्षांचे माहेर देऊळगावराजा तालुक्यातील गव्हाण..वर्षाचे वडील महावितरण मध्ये कार्यरत होते मात्र त्यांचे अकाली निधन झाले. सध्या वर्षाची आई आणि भाऊ हा बुलडाणा तालुक्यातील येळगाव येथे स्थायिक झाले आहेत. अतिशय मेहनतीने वर्षाने २००८ सली पोलीस दलात नोकरी मिळवली. वर्षाचा पती किशोर हा खैरव येथील शेती सांभाळायचा. त्या तुलनेत वर्षा नोकरीला असल्याने जास्त कमवायची. सध्या वर्षा आणि तिचा पती दोन मुलींसह चिखलीतील पंचमुखी महादेव मंदिराजवळ पंजाबराव येवले यांच्या भाड्याच्या खोलीत रहायचा. याच घरासमोर त्यांच्या घराचे बांधकाम सुरू होते, ते अंतिम टप्प्यात आले होते. दरम्यान दोघा पती पत्नीत छोट्या छोट्या कारणावरून कुरबुरी सुरू होत्या. नवरा त्रास देत असल्याचे वर्षाने तिच्या आईला सांगितले होते असे तिची आई रडतांना बोलत होती. वर्षाची आई कालच वर्षाकडे येणार होती मात्र आज नागपंचमी असल्याने मी परवा येईल असे तिच्या आईने तिला सांगितले होते. मी कालच आले असते तर ही घटना घडली नसती असे वर्षाची आई रडतांना सांगत होती.