नवरोबाचा कारनामा! सासूने धरून ठेवले अन नवऱ्याने नको ते केलं.....! खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार

 
Ps
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काहीच कारण नसताना पत्नीला नको - नको त्या शिव्या देणाऱ्या नवरोबावर खामगाव शहर पोलिसात पत्नीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ.नलिनी नारायण वडाळे वय ४० वर्ष (रा.मोरे संकुल, वाडी - खामगाव) असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. सौ.नलिनी वडाळे ह्या ३० ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान आपल्या स्वतःच्या घरातील अंगणात झाडझुड करीत होत्या. याचवेळी त्यांचे पती नारायण नामदेव वडाळे वय ४६ वर्ष याने काही कारण नसताना अश्लील शिवीगाळ केली. सासू सोनाबाई नामदेव वडाळे वय ७० वर्ष यांनी सौ नलिनी यांना पकडून ठेवले, पती नारायण याने डाव्या हाताच्या मनगटावर, उजव्या खांद्यावर, कमरेवर काठीने मारहाण केली. हातातील मोबाइल हिसकावून भिंतीवर फेकून मारला असे सौ नलिनी वडाळे यांनी ३० ऑगस्ट रोजी खामगाव शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास नापोका अर्चना उमाळे करीत आहेत.