बापाचे "पाप"! बायको माहेरी गेल्यावर पोटच्या अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवून केले प्रेग्नेंट; मुलीची आई पोलिसांना म्हणे आमचे घरचे मॅटर घरात निपटतो; अखेर असा झाला शेवट...! चिखलीची धक्कादायक घटना

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पोटच्या मुलीसाठी बाप म्हणजे साक्षात देव! पण स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याला बाप नाही तर जीता जगता सैतान म्हणावं लागेल. बापलेकीच्या पवित्र नात्याला कलंक लावला तो चिखली पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या शेख शकील नावाच्या नराधमाने. बायको माहेरी गेल्यावर वासनांध बापाने स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यातून ती प्रेग्नेंट राहिली. मुलीचे पोट दुखू लागल्यानंतर प्रकरण हॉस्पिटल पर्यंत गेले. मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांनी पोलिसांनी कळवले. विशेष म्हणजे त्यावेळी पोटच्या मुलीवर अत्याचार झाला असताना देखील मुलीच्या आईने स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. आमचे घरचे मॅटर आहे, आम्ही घरात निपटतो असे ती पोलिसांना म्हणाली..मात्र प्रकरण गंभीर असल्याने पोलीसांनी प्रकरणाचा पाठपुरावा करून बापाचे पाप उघडे केले.
मार्च २०२३ मध्ये चिखली तालुक्यातील पिडीत अल्पवयीन १६ वर्षीय मुलगी पोट दुखत असल्याने आपल्या आईसह चिखली येथील दवाखान्यात गेली होती. डॉक्टरांनी मुलीला तपासले, तर तिला चार महिन्याची गर्भधारणा असल्याची धक्कादायक बाब समोर आली. याविषयी डॉक्टरांनी पिडीतेला विचारले पण तिने काही एक सांगितले नाही. ही घटना अतिशय गंभीर असल्याचे दिसून येतात, डॉक्टरांनी एमएलसीद्वारे चिखली पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण तळी यांनी हॉस्पिटलला भेट देत पीडित मुलीची व तिच्या आईची चौकशी
 केली.
 आई म्हणे आमच्या घरचे मॅटर!
 दरम्यान, या प्रकारानंतर हे प्रकरण आमच्या घरचे आहे आम्ही घरातच निपटारा करू असे पिडीत मुलीने व तिच्या आईने सांगितले. मुलीला रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी तिला बुलढाणा हलवले. त्याचनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक तळी यांनी चिखली पोलिसांत अज्ञात आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला.
बापाचे ' पाप ' आले समोर 
 पिडीतेला विश्वासात घेतल्यानंतर, तिच्या आईसमक्ष तिचे बयान नोंदविण्यात आले. पीडित ने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्यात आल्याचे सांगितले. यावर कळस म्हणजे, तिच्या स्वतःच्या बापानेच हे दुष्कृत्य केल्याचे ती म्हणाली. पिडीतेच्या आईचे जेव्हा बयान नोंदविण्यात आले, तेव्हा त्यांनी देखील तिच्या वडिलांनीच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे सांगितले. हे ऐकून पोलिस हादरून केले. हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असल्याचे लक्षात येताच. पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पीडितेचा नराधम बाप शकीलला अटक करण्यात आली. बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी म्हणून तो निष्पन्न झाला.
न्यायालयाचा दणका! 
 पुढील तपासासाठी पिडीत अल्पवयीन मुलीचे व तिच्या नराधम बापाचे डीएनए नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. यावेळी सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी स्वतःकडे घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे यांनी पीडित मुलीसह तिच्या आईचे बयान व्हिडिओग्राफीतून घेतले. आरोपी शकील विरोधात पुरावा मिळून आल्याने बुलढाणा येथील विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. हे प्रकरण सरकार तर्फे चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांना सोपविण्यात आले. प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासल्या गेलेत. पिडीता, तिचा गर्भ व आरोपीचे डीएनए नमुने असा रासायनिक विश्लेषण अहवाल सुद्धा प्राप्त झाला. त्यामध्ये पिडीता व आरोपी दोघांचीही नाते बाप लेक असल्याचे वैद्यकीय रित्या निष्पन्न झाले. डिसेंबर २०२२ मध्ये पिडीतेची आई माहेरी गेलेली असताना तिच्या वडिलांनी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले असे सिद्ध झाले. आरोपीने वैद्यकीय तपासणी दरम्यान, डॉक्टरांना सांगितलेल्या घटनेचा तसेच इतर पुराव्यांना ग्राह्य धरत विशेष न्यायाधीश श्री आर. एन. मेहरे यांनी आरोपी विरोधात गुन्हा सिद्ध होत असल्याचे नमूद केले. बचाव पक्षातर्फे करण्यात आलेल्या युक्तीवादात मुलीचा जन्माचा दाखला न्यायालया समोर सादर केलेला नाही. यामुळे विशेष न्यायाधीश श्री मेहरे यांनी पुराव्या कायद्याचे कलम १६५ नुसार संबंधित ग्रामपंचायतला व ग्रामविकास अधिकाऱ्याला पिडीत मुलीचा जन्म दाखला सादर करण्याबाबत आदेश दिले. कोर्टाचा साक्षीदार म्हणून त्यांचा पुरावा देखील नोंदविण्यात आला. प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांनी प्रखर युक्तिवाद केल्यानंतर उपलब्ध असलेल्या पुराव्यातून विशेष न्यायाधीश श्री मेहरे यांनी शिक्षा सुनावली. आरोपी शेख शकील यास पोक्सो कायद्यानुसार मरेपर्यंत शस्त्रम जन्मठेपेची शिक्षा व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात वण्यात आली. दंड न भरल्यास तीन महिने साध्या तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुद्धा ठोठावली गेली आहे. प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संतोष खत्री यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून चिखली पोलीस हवालदार नंदाराम इंगळे, झगरे व मिसाळ यांनी सहकार्य केले.