बाप दारू पिऊन यायचा, आईला मारायचा! मग काय... अल्पवयीन मुलाचा राग अनावर झाला, एका फटक्यात कार्यक्रम केला! बापाच्या खुनाप्रकरणी मुलाला अटक! देऊळगावराजा तालुक्यातील मंडपगावची घटना

 
ghj
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  साडेसतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला जन्मदात्या बापाच्या खुनाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील मंडपगावात ही खळबळजनक घटना समोर आली आहे.
 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंडपगाव येथील ४० वर्षीय व्यक्तीचा ५ जून रोजी मृत्यू झाला होता. डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे उत्तरीय तपासणी अहवालात समोर आले होते. त्यावरून पोलिसांनी संशयित म्हणून खून झालेल्या व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले, पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर मुलाने बापाच्या डोक्यात मूर्ती मारल्याची कबुली दिली.

 बापाला दारूचे व्यसन होते ,आईला मारायचा..!

अल्पवयीन मुलीच्या बापाला दारूचे व्यसन होते.  दोघे  पती - पत्नी  मूर्तिकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. "माझ्या वडिलांना दारूचे व्यसन लागल्याने ते आईला दररोज गोंधळ करायचे, आईला व आम्हालाही मारायचे.  गेल्या वर्षी दारूच्या नशेत त्यांनी माझ्याच पोटात चाकू खुपसला होता असे अल्पवयीन मुलाने पोलीस चौकशीत सांगितले." ५ जून रोजी मुलाचा बाप दारू पिऊन घरी आला, त्याने नेहमी प्रमाणे गोंधळ घालायला सुरुवात केली.  यावेळी मुलाने रागाच्या भरात घरातील मूर्ती वडिलांच्या डोक्यावर फेकून मारली, मुलाचे वडील जागीच कोसळले..मुलाने तातडीने वडिलांना देऊळगाव मही येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात नेले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपासला सुरुवात केली. गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले, तेव्हा दारुड्या वडिलांना मूर्ती फेकून मारल्याचे मुलाने कबूल केले. पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.